Category: Uncategorized
-
Take a look at this post… ‘व्यक्त अव्यक्त ‘.
http://pradnyaagawane.blogspot.com/2022/11/blog-post.html
-
Take a look at this post… ‘व्यक्त अव्यक्त ‘.
http://pradnyaagawane.blogspot.com/2022/11/blog-post.html
-
-
एक कवीता
🪔 अस्ताचलाकडे जाणार्या सूर्यनारायणाने निस्तेज होत जाणार्या विश्वाकडे वळून पाहत प्रश्न केला ‘ यापुढे माझे काम कोण करेल?’ कोणीच बोलले नाही. तेव्हा …. एक पणतीतील ज्योत म्हणाली ‘ मी करीन , मी करीन ; माझ्या कुवतीप्रमाणे ; 🪔 ही कविता कोणी लिहिली माहीत नाही. लहानपणी कोणत्या तरी पुस्तकात वाचली. पुस्तकाचे नाव काही आठवत नाही. पण…
-
मन पाऊस पाऊस
गार वारा हा भरारा, नभ टिपूस टिपूस,रानीवनी पानोपानी, मन पाऊस पाऊस 🌧 मन, पाऊस, आठवणी, सोबत चहा, भजी, भुट्टा यांचा मेळ फक्त पावसाच्या ऋतूत जुळून येतो. पाऊस हा माणसाच्या मना सारखा आभाळ भर दाटून येतो आणि इतका कोसळतो की ही सगळी अवनी स्वच्छ, नितळ होवून जाते. अशा या सुंदर ऋतू वर अनेक कविता, शेरोशायरी, गाणी…
-
संगोपन
मुले ही देवाघरची फुले असतात. फुले जशी नाजुक आणि कोवळी असतात. तसे लहान मुलांचे तन आणि मन नाजुक आणि कोवळे असते. एका छोट्याशा रोपट्या ला थोडेसे प्रेम , सूर्यप्रकाश आणि पाणी यांची गरज असते. तसेच आपल्या लहान बाळांना आईच्या प्रेमाची आणि त्यांच्या काळजीची जास्त गरज असते. प्रसुती च्या वेळी बाळाच्या शरीराची उष्णता नष्ट होते. आपल्या…
-
” मैं अपनी favourite हूँ “
आपण कसे आहोत यापेक्षा आपण कसे दिसतो … आपले कपडे कसे आहेत हे सध्या खूप महत्त्वाचे झाले आहे. मुलगा असो किंवा मुलगी … कोणीही या अशा लोकांच्या नजरेतून सुटत नाही. जन्म झाल्यावर , आपण सगळेच खूप cute, गोड आणि गोंडस असतो. जसे मोठे होत जातो तसा आपला खरा चेहरा समोर येत जातो. मग सावळा –…
-
ती
अरे संसार संसार , जसा तवा चुल्यावर , आधी हाताला चटके, मग मिळते भाकर ही बहिणाबाई ची कविता तिची संसारातील आपल्याला ओळख करून देते. घड्याळ्याच्या काट्यावर चालत असते ती… फक्त इतरांसाठी… सगळ्याच्या वेळा सांभाळता सांभाळता स्वतः ला वेळ द्यायचे विसरून जाते ती. चेहर्यावरची रेषही न हलता घरातल्या माणसांसाठी झटणारी ती, एखाद्या super women सारखी वावरत…
-
आपली माणसे
अनेक भाषा आणि अनेक जाती हे जरी खरे असले तरी अनेक माणसे आणि त्यांच्या जाती हे पण तितकेच खरे आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव जरी वेगळा असला तरी category wise माणसांचे स्वभाव असतात हे मला समजायला कदाचित थोडा उशीर झाला असावा. काही माणसे समजूतदार category मध्ये असतात. ज्यांना इतर माणसांना समजून घ्यावेच लागते त्यांच्या या समजूतदार…