Skip to content
Queen
Home
गोष्ट
28th Feb 2026
गोष्ट साने गुरुजी यांनी लहान मुलांना देवाघरची फुले असे म्हंटले आहे. त्यांचे निर्मळ मन हे फुलां प्रमाणे पावित्र आणि शुद्ध असते. मुलांची हीच निरागसता आणि शुद्धता…आता कुठेतरी हरवत चालली आहे. अशा लहानग्यांच्या गोड हसण्यामध्ये ईश्वराचे रूप सामावलेले आहे. पण सध्या … आपल्या गोजिरवाण्या घरात मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही यासारखी खेळणी हातात आल्यामुळे…. ते थोडा वेळ का होईना ….कधीतरी एखाद्या दिवशी webseries किंवा भयानक गोष्टी त्यावर बघतात. आणि या सगळ्याचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होतो. झोप न लागणे किंवा वाईट स्वप्नं पडून … दचकून जागे होणे, झोपेत बडबड करणे, घाबरणे असे प्रकार पहायला मिळतात. मुले दिवसभर जे बघतात किंवा ऐकतात ते मेंदूत … मनात साचत जातं. मनी वसे ते स्वप्नी दिसे. मुलांचा दिवसभराचा जगाचा अनुभव किती negative आहे हे आपल्याला कळत नाही. स्वप्नं म्हणजे नेमके काय? तर आजच्या अनुभवातून उद्याची कल्पना करणे. त्यामुळे मुले जे दिवसभर पाहतात…ऐकतात त्याचीच कल्पना करतात. म्हणून रोज रात्री झोपताना मुलांना एक सुंदर गोष्ट सांगितली गेली पाहिजे. आज जगाचा अनुभव थोडा जरी वाईट आला तरी उद्याचा दिवस हा सुंदरच असणार आहे. हे त्यांच्या नेणीवेत कुठेतरी झिरपत राहीलं पाहिजे. रोजची गोष्ट ही त्यांना सुंदर अशा जगात घेवून जाते. आणि मुलांचे मन आशावादी होते. मोबाईल वर असे अनेक reels किंवा प्रसंग दाखवले जातात. जे नकारात्मक असतात. त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. भितीदायक प्रसंगामुळे त्यांना झोपेच्या समस्या निर्माण होतात. तसेच चुकीच्या सवयी ना बळी पडू शकतात. मुलांना गोष्ट ऐकवणे म्हणजे त्यांच्या बुद्धीचा आणि कल्पना शक्तीचा मार्ग मोकळा करण्यासारखे आहे. ससा आणि कासवाची गोष्ट….चिकाटी आणि संयम कसा असावा हे शिकवते. कोल्हा … करकोचा च्या गोष्टीमध्ये कराल तसे भराल हे समजते. हुशार मुंगूस या गोष्टीमध्ये … रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा असतो. याची त्यांना प्रचिती येते. लाकूडतोडया ची गोष्ट प्रामाणिकपणा शिकवते. मुलांना गोष्टी सांगणे हे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे. गोष्टी ऐकताना … एका जागी स्थिर राहून लक्ष दिले जाते. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. तसेच … त्यांचा शब्दसंग्रह व विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढते. रोज थोडा वेळ काढून अशा प्रकारे तुम्ही मुलांशी संवाद साधू शकता. गोष्टीतल्या पात्रांशी एकरूप होवून…अगदी रंगवून तुम्ही गोष्ट ऐकवली तर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. काय चूक आणि काय बरोबर हे समजते. नैतिक मूल्ये आणि आपल्या संस्कारांची रुजवण होते. फक्त एका गोष्टीमुळे तुमचे आणि त्याचे नाते घट्ट होते.
27th Feb 2026
सुवर्णमध्य
2nd Feb 2026
2nd Feb 2026
उसंत
2nd Jan 2026
Next Page
Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here:
Cookie Policy
Subscribe
Subscribed
Queen
Sign me up
Already have a WordPress.com account?
Log in now.
Queen
Subscribe
Subscribed
Sign up
Log in
Copy shortlink
Report this content
View post in Reader
Manage subscriptions
Collapse this bar
Design a site like this with WordPress.com
Get started