Zen Zen म्हणजे काय? असा प्रश्‍न सगळ्यांना पडला असेल.  Zen तत्त्वज्ञान ही बुद्ध धर्मातील एक सुंदर विचारसरणी आहे.  ही विचारसरणी प्रत्यक्ष अनुभव आणि ध्यान….यावर भर देते. Zen चा अर्थ ध्यान असा होतो.  Zen ही एक बौद्ध परंपरा आहे.  या परंपरेत आत्मपरीक्षण आणि ध्यान धारणेतून आपल्याला…आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा करता येते. Zen तत्त्वज्ञान तुम्हाला अगदी छोट्या गोष्टीतून….एक नवा दृष्टिकोन सहज देवून जाते.  तुम्ही जेव्हा नदीत आपलं पहिलं पाऊल टाकता.  त्यानंतर तुमचं दुसरं पाऊल त्याच ठिकाणी ठेवू शकत नाही. नदीचे पाणी हे वाहतं असतं.  त्यामुळे नदीच्या पाण्यात आपण….आपलं पहिलं पाऊल टाकतो. तेव्हा ते पाणी आपल्या पायाला बिलगून पुढे निघून जातं.  पुन्हा कधीच त्या पाण्यात आपण….आपले पाऊल टाकू शकत नाही.  आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा असाच आपल्याला स्पर्श करून पुढे निघून जातो.  तो पुन्हा मागे आणता येत नाही. आपल्याला पुढे जावं लागतं. साचून राहिलेलं पाणी हे गढूळ होत जातं. मात्र वाहतं पाणी हे स्वच्छ आणि पारदर्शी राहतं. निसर्ग हा आपल्याला सतत…. कसे जगायचे….हे शिकवत असतो.  कधी आपण पाऊल असतो तर कधी आपण पाणी असतो.  कधी स्थिर असतो.  तर कधी अस्थिर….पण तरीही आपण….प्रत्येक क्षणात…नवे असतो. Zen म्हणजे काय? तर काहीही धरून ठेवू नका.  सोडून द्या.  श्वासांचा आस्वाद घ्या.  कृतज्ञतेने श्वास घ्या आणि प्रेमाने श्वास सोडून द्या. आपल्या आयुष्यातील अनेक समस्या ध्यान धारणेतून आपण कमी करू शकतो.  खरा आनंद फक्त संपत्ती आणि प्रसिद्धी नाही.  तर तो आपल्या आत आहे.  बौध्द धर्म आपल्याला हेच सांगतो.  तुम्ही इतरांना जितके द्याल.  तितके तुम्हाला मिळेल.  दैनंदिन जीवनात zen मनाला आतून शांत करते.  त्यामुळे आपले मानसिक आरोग्य तर सुधारते पण हल्ली कमी वयात होणारे BP, Stress, Hyper tension, Imunity, Sleeping problem अगदी सहज सुधारतात.  तेव्हा स्वतः साठी आपला zen प्रवास सुरू करा.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started