प्रेमाला उपमा नाहीप्रेमाची परिभाषा शब्दात मांडता येणार नाही.  पण तरीही अनेक थोर महात्मे आणि संतानी आपल्या प्रबोधनाने प्रेमाला जिवंत ठेवले. प्रेमा शिवाय ही पृथ्वी अपूर्ण आहे. असे लोकांना परोपरीने समजावले. प्रेम हा खरं तर किती छोटा शब्द आहे.  पण त्यातच सगळं जग सामावलेले आहे.  प्रेमा सारखी सुंदर भावना समजण्यासाठी आपल्याला एक जन्मही अपुरा पडेल. शाळेत आम्हाला रोज एक हात पुढे करून आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणावी लागत असे.” माझे माझ्या देशावर प्रेम आहे.” हे वाक्य बोलताना आपोआप मान उंच आणि पाठीचा कणा ताठ होत असे. त्यात असणार्‍या प्रेमाची छाप अजूनही मनावर कोरली गेली आहे. इंद्रधनुष्या प्रमाणे… प्रेमाचे रंग वेगळे, अर्थ वेगळे….शहर,  राष्ट्र,  देश…हे प्रेम वेगळे….शाळा,  college,  शिक्षक…यांचे प्रेम वेगळे…कुटुंबाचे प्रेम आणि  मित्र, मैत्रिणी साठी असलेले प्रेम वेगळे…छटा वेगळ्या असल्या तरी आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य एकच आहे.प्रेम हे रंग,  रूप  हे पाहून होत नाही. ते फक्त एका मनाचे दुसर्‍या मनाशी जुळणारा बंध आहे.  म्हणजे आजकालचे connect होणे …असायला हवे.  मान,  अपमान,  तिरस्कार,  राग याला या भावनेत जागा नाही. स्वार्था पलीकडे असणारी भावना आहे ही….यात दुसर्‍याचा आनंद  आणि हित याचा विचार असायला हवा ना!पण आज काल असे होताना दिसत नाही.  माणसांबरोबर त्यांचे प्रेम देखील professional झाले आहे. अन्न,  वस्त्र,  निवारा  या पलीकडे पण अनेक गरजा आहेत.  हे  आजूबाजूला पाहिले की लक्षात येते.  माझा आनंद,  माझी space,  माझा ego असा मीपणा बळावत चाललाय.  तुझं ते माझं आणि माझं ते माझंच आहे असा सध्या हिशोब आहे.  प्रेम हे आंधळं असतं…. असे असताना सध्या ते मूकं आणि बहिरं सुद्धा झालंय .क्षमा, त्याग,  दया,  सहनशीलता हे मोठे शब्द फक्त पुस्तकात वाचायला मिळतात.  सध्या माणसांशी येणारा यांचा संबंध फार क्वचितच पाहायला मिळतो. माणसाचा जन्मच मुळी प्रेमाच्या उत्कट भावनेतून होतो. आपल्या या जन्माचे सार्थक करायचे असेल तर ऐकायला शिका…. माफ करायला शिका….आनंद द्यायला शिका….सन्मान करायला शिका. थोडसं मी पणा च्या जगातून बाहेर या. आणि आपल्या आयुष्यातले छोटे… छोटे क्षण मनसोक्त जगा. “माझे मन तुझे झाले….तुझे मन माझे झाले”  या काव्यात एकदा दोन हृदय एक झाली की बाकी उरते ते फक्त प्रेम 💞मी कशी ओळखू प्रीती…. हे हृदय म्हणू की लेणे प्रेमाला उपमा नाही…. हे देवाघरचे देणे 💞

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started