Respect

नाते कोणतेही असो त्यात मानसन्मान नसेल तर ते नाते पोकळ होवून जाते. “मानसन्मान ” हा खूप जड शब्द आहे. Actually “Respect” हा शब्द एकदम correct आहे. नवरा आणि बायको चे नाते प्रेम आणि विश्वास यावर अवलंबून असले तरी सर्वात महत्त्वाचे आहे.. त्या दोघांनी एकमेकांचा respect करणे. मनापासून respect असेल तर नात्याला तडा कधीही जात नाही. सासू आणि सुने मधला वाद हा तर पूर्वी पासून चालत आला आहे. हा वाद न संपणारा आहे. पण त्यात प्रेमाचा ओलावा आणि respect असेल तर मर्यादाच कुंपण आपोआप तयार होते आणि सासू आणि सून त्या कुंपणात बागडत राहतात. फुलपाखरा सारख्या …. भाऊ आणि बहिणीचे नाते तर मैत्रीच्या पायावरच उभे असते. पण त्यात थोडासा respect असेल तर ते सदैव टवटवीत राहते. आई , बाबा , मुलगा किंवा मुलगी यांचे नाते तर जिव्हाळा च्या हिंदोळ्यावर झुलत असते. या नात्यात तर respect असलाच पाहिजे. तरच हे संबंध घट्ट बंधना मध्ये बांधलेले राहतात, कायमचे …. आता नाते राहिले दीर , भावजय आणि नणंद , भावजय यांचे …. थोडेसे भाऊ आणि बहिणीच्या नात्या कडे झुकलेले आणि थोडेसे आदरयुक्त मैत्री कडे झुकलेले असे हे गोड नाते …
Respect करणे किंवा न करणे हा ज्याचा त्याचा स्वभावाचा भाग आहे. पण नात्या मध्ये फक्त प्रेमालाच जपणे गरजेचे नाही. तर एकमेकांचा respect करून एकमेकांचा स्वाभिमान जपणं ही तितकंच गरजेचे आहे.






Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started