Myself

शाळेत असताना आपण एक निबंध लिहायचो. ” Myself ” स्वतः बद्दल लिहताना थकत नव्हतो. आपले नाव, वय, आई चे नाव, वडीलांचे नाव , आपले छंद, friends आणि आपला आवडता विषय. Myself निबंध वाचताना तेव्हा खूप छान वाटायचे. पण जसे मोठे होत जातो तसे आपण अनेक नात्यात गुरफटून जातो. सगळी नाती निभावतो पण स्वतः शी असणारे नाते मात्र विसरून जातो. माझे पण थोडे असेच झाले. आज स्वतः बद्दल माझ्याकडे सांगण्यासारखे फार काही नाही. एक मुलगी, बायको , आई आणि गृहिणी असा सुंदर प्रवास सध्या चालू आहे. माझे छंद जोपासण्याचा जमेल तसा प्रयत्न करते. पण काहीतरी आहे जे सापडत नाही. ते म्हणजे या नात्यात हरवून गेलेली मी. ” Myself “

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started