संगोपन

मुले ही देवाघरची फुले असतात. फुले जशी नाजुक आणि कोवळी असतात. तसे लहान मुलांचे तन आणि मन नाजुक आणि कोवळे असते. एका छोट्याशा रोपट्या ला थोडेसे प्रेम , सूर्यप्रकाश आणि पाणी यांची गरज असते. तसेच आपल्या लहान बाळांना आईच्या प्रेमाची आणि त्यांच्या काळजीची जास्त गरज असते.

प्रसुती च्या वेळी बाळाच्या शरीराची उष्णता नष्ट होते. आपल्या ऋतु प्रमाणे त्यांना आवश्यक ती ऊब मिळायला हवी. मुलगा असो किंवा मुलगी ते आपल्यासाठी special आहे. हाच विचार पालकांनी करायला हवा. बाळांना छान तेलाने मालीश , कोमट पाण्याने त्यांची आंघोळ , नरम अशा मऊ कपड्यां मध्ये त्यांना गुंडाळून पाळण्यात झोपवावे. नवजात बाळाला शांत झोपेची नितांत गरज असते. पहिले दोन महिने बाळ 15 ते 20 तास झोपते. ती ऊब, ती मालीश, ती धुरी हीच त्यांना मजबूत करत असते. त्यांची वाढ होण्यास मदत होते. बाळाला मसाज केल्याने त्याचे रक्ताभिसरण सुधारते आणि ते छान झोपते. या सगळ्यात आपल्याला जुन्या पिढीचा खूप मौल्यवान सल्ला मिळतो. आणि त्याचा उपयोग ही होतो. त्यांनी एक मोठा काळ अनुभवलेला असतो. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन नवीन पिढी च्या पालकांनी नक्की घ्यायला हवे.

जन्मापासून पहिले सहा महिने बाळाला फक्त स्तनपान द्यावे. या काळात आईचे दूध हे बाळासाठी अमृत असते. आईच्या दुधात रोगप्रतिबंधक द्रव्ये असतात. त्यामुळे बाळ जुलाब, पोलिओ आणि गोवर यासारख्या रोगांचा मुकाबला करू शकते. आणि आई … बाळाचे नाते घट्ट विणले जाते. आईला सुद्धा स्तनपान केल्याचा फायदा होतो. तिला होणारा रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. आणि वजन control मध्ये रहाते.

सहा महिने बाळ हे फक्त आईच्या कुशीत बहरते. एका सुंदर रोपट्या चे मूळ हे आई असते आणि खोड हे बाबा असतात. ज्यावर ही बाळ रुपी पालवी फुटते. बाळांना जशी मालीश च्या हाताची आणि मायेच्या उबेची गरज असते. तसेच आपल्या जवळच्या नात्या चे स्पर्श आणि डोळ्याची … प्रेमाची भाषा समजून घेण्याची गरज असते. तुम्ही म्हणाल एवढे छोटेसे बाळ काय गप्पा मारणार. पण ती गंमतच वेगळी आहे. गप्पा आपण मारायच्या आणि ते फक्त आपल्या बोलण्यावर react करत असते. पण ही जी देवाणघेवाण आहे तो एक communication चा प्रकार आहे.

नवजात बाळाची त्वचा खूप नाजुक असते. त्यामुळे त्याची काळजी घेताना साबण कोणता वापरावा किंवा डाळीचे पीठ वापरावे का नाही हे बाळा च्या त्वचेला suit होईल त्याप्रमाणे वापरावे. त्यांना rashes चा त्रास होत असेल तर डायपर वापरु नयेत. सुती लंगोट वापरावे. जर बाळांना त्रास होत नसेल. तर बाहेर जाताना, समारंभाला, रात्री झोपताना त्यांना डायपर घालावेत. म्हणजे आईला … आणि बाळाला शांत झोप मिळते.

बाळ रडून नेहमी आई … वडिलांचे लक्ष वेधत असते. त्यांना सतत आईचा स्पर्श हवा असतो. यात चूक काही नाही. पण त्यांना वाईट सवयी लावू नका. ज्यामुळे तुम्हाला पुढे त्याचा त्रास होवू शकतो. बाळाला खूप वेळ मांडीवर किंवा कडेवर घेतल्याने त्यांना तीच सवय लागते. मग ते कोणाकडे जायला मागत नाहीत. आईच्या कामाचा त्यामुळे खोळंबा होतो. आणि पुढे हीच सवय सगळे कठीण करून टाकते. बाळाला छान त्याच्या बिछान्यावर झोपवून आपण खेळू शकतो. म्हणजे ते ही मोकळे पनाने खेळू शकते.

असा हा बाळाचा सहा महिन्याचा सुवर्णकाळ आईसाठी खूप महत्वाचा असतो. स्वतः बरोबर बाळाची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी तिला पार पाडावी लागते. नऊ महिने बाळाशी जोडलेली नाळ विलग होते कारण त्याची वाढ आणि विकास होण्यासाठी … आपल्या सुरक्षित आवरणात त्यांना कोवळा सूर्यप्रकाश ही द्या. आणि मायेचा पाझर ही द्या. गरज दोघांची आहे. त्याशिवाय ते योग्य पध्दतीने बहरणार नाही. माझे बाळ … माझे बाळ असे म्हणून अनेक आया छातीशी कवटाळून ठेवतात. पण ते चुकीचे आहे. बाळाला जसे पोषक आहाराची गरज आहे तसे त्यांना थोड्याशा बाळकडू ची ही गरज असते. हे लक्षात ठेवा … आणि हे सुंदर क्षण enjoy करा. जबाबदारीचे ओझे वाटून न घेता …. बाळाचे संगोपन करा.



Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started