लोहपुरुष

आपल्या भारत देशात अनेक सुंदर प्रकल्प आहेत. जे खरंच वाखाणण्या सारखे आहेत. त्यात इतिहास कालीन किल्ले आणि मान्यवर व्यक्तीचे उभारलेले पुतळे माझ्यासाठी खूप अचंबित करणारी आदर युक्त गोष्टी आहेत. जगातील सर्वात उंच म्हणजे 182 मीटर उंचीचा सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा, त्यांच्या कार्याच्या भव्यतेची साक्ष देणाराच आहे. 20 हजार चौरस मीटर क्षेत्रा मध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर हे स्मारक साकारलेले आहे. हे फक्त एक स्मारक नाही तर एक परिपूर्ण प्रकल्प आहे असे म्हणता येईल. पुतळा निर्जीव असतो हे सत्य जरी असले तरी हा लोहपुरुष आपल्या भारत देशाच्या सक्षमते बद्दल बोलतो. हे मात्र खरं… अशा सजीव लोहपुरुषाला माझे शतशः वंदन 🙏

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started