किल्ला

महाराष्ट्राचे दैवत आणि इतिहासातील महान शूरवीर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या शासन काळात जवळपास 360 किल्ले जिंकले… आपल्या जिवाची बाजी लावून जिंकलेले हे किल्ले आणि त्यांच्या महाराजांच्या जिवंत स्मारकाची अवस्था मात्र बिकट होत चालली आहे. अशा संपत्तीची देखभाल करणे हे आपले प्रामाणिक कर्तव्य आहे. आपणच आपला मराठी बाणा जतन करणे गरजेचे आहे. पूर्वी किल्ल्याचे संवर्धन करण्याचे हेतू जरी वेगळे होते. तरी आज अशा किल्ल्यावर हल्लीची तरुणाई trecking साठी येत असते. तेव्हा या तरुणांनी किल्ल्याचे महत्त्व समजून घ्यायला हवं. किल्ल्याची डागडुजी करणे, किल्ल्याच्या आजूबाजूच्या आवारात कचरा न करणे, अशा ठिकाणी शौचालय / मुतारी म्हणून वापर न करणे… अशा तर्‍हेने आपणच थोडासा हातभार लावू शकतो. कोणीही देखरेख करणारे नसल्यामुळे या परिसरामधे दारू पिणे, जुगार खेळणे असे प्रकार सर्रास चालू असतात… नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पाउले उचलेली आहेत.

देश आमुचा शिवरायांचा

झाशीवाल्या रणराणीचा

शिर तळहाती धरू

जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रूंसंगे

युद्ध आमुचे सुरू

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started