अनेक भाषा आणि अनेक जाती हे जरी खरे असले तरी अनेक माणसे आणि त्यांच्या जाती हे पण तितकेच खरे आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव जरी वेगळा असला तरी category wise माणसांचे स्वभाव असतात हे मला समजायला कदाचित थोडा उशीर झाला असावा.
काही माणसे समजूतदार category मध्ये असतात. ज्यांना इतर माणसांना समजून घ्यावेच लागते त्यांच्या या समजूतदार स्वभावाचा त्यांना फायदा कमी आणि तोटा जास्त होतो. पण तरीही त्यांचा समंजसपणा तसूभरही कमी होत नाही.
काही माणसे स्वार्थी category मध्ये मोडतात. अशा माणसांना आपल्या स्वार्था पलीकडे काही दिसत नाही. त्यांना जे काही हवंय ते मिळवण्यासाठी ते वाट्टेल त्या थराला जातात; वाट्टेल तसे वागतात. म्हणजे वरवर खूप गोड वागायचे अगदी साखरेची गोडी ही कमी पडेल आणि मनात फक्त दूःस्वास !
काही माणसे खूप मानी स्वभावाची असतात. म्हणजे यात त्यांचा अहंकार आणि त्यांची घमेंड अशी दोन जुळी भावंडे पण येतात. ही माणसे ” मी ” मध्ये अडकलेली असतात. मी, माझे एवढेच त्यांना माहीत असते. मी च्या पलीकडे , आजूबाजूला, शेजारी पाजारी, इकडे तिकडे कोणाचेही अस्तित्व त्यांना मान्य नसते. स्वतः च्या कोषात राहणेच त्यांना पसंद असते. दुसर्यांना कमी लेखणे आणि त्यांचा पाणउतारा करणे हा त्यांचा छंद असतो.
कोणत्याही गोष्टीकडे तटस्थपणे पाहायला मला खूप आवडते. आजूबाजूच्या अनेक माणसांकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. पण या माणसांचे काय? असे मुखवटे घालून कशी जगतात ही माणसे; असाच प्रश्न मला पडतो. तसेही मी या practical जगामधे वावरणारी एक छोटीशी पणती आहे. जिचा प्रकाश फक्त तिच्यापुरता मर्यादीत आहे.
ही माणसे आपल्या जवळची असतील. तर त्याचा खूप जास्त त्रास होतो. आपण आपल्या समजूतदार आणि शांत स्वभावाच्या limit मध्ये असतो. आणि ते मात्र उधाण आल्यासारखे वागत असतात. आपण मान ठेवून वागतो आणि ते मात्र आपला अपमान करण्यात धन्यता मानतात. ही माणसे फक्त दुसर्याना त्रास देण्यासाठी असतात. मला माहित नाही की यात त्यांना कोणते समाधान मिळते.
आता इतकी वर्ष झाली की आजूबाजूच्या अशा माणसांची सवय होवून गेली. आमचा समंजसपणा दिवसेंदिवस वाढतोय आणि त्यांचा मीपणा. आपला अपमान करून आणि आपल्याला टोचून बोलून जर त्यांना छान वाटत असेल तर वाटू दे. शेवटी ती ” आपली माणसे ” आहेत. आपली समाधानाची आणि आनंदाची व्याख्या वेगळी आणि त्यांची वेगळी असा funda सध्या मी अवलंबिला आहे. त्यामुळे सगळं All Is Well 🙏
Leave a comment