Skip to content
Queen
Home
कुटुंबवत्सलभिंती खिडक्या दारे नच घर छप्पर सुंदर तेही नच घर माणुसकीचे लावी अत्तर!ते माझे घर! ते माझे घर!श्रीराम आठवले यांची ही कविता खरचं चिंतन करण्यासारखी आहे. प्रत्येकाला हवे असणारे घर हे फक्त चार भिंतीनी नाही तर त्यात राहणार्या माणसांनी बनते. सुरक्षिततेची हमी देणारे भर भक्कम छप्पर आणि त्या आधारावर उभ्या असणार्या दिलासा, उमेद, जिव्हाळा, प्रेम या चार भिंती….त्यांना असणारी मायेची खिडकी आणि सुखाचे दरवाजे म्हणजे घर ! 🏠अशा घरात एकत्र नांदणारे सगळे जण हे आपलं ‘ कुटुंब ‘पोटा पाण्यासाठी धावणारे माणसाचे पाय…दिवसभराची दगदग संपली की जिथे घराच्या ओढीने परततात आणि सुखाने स्थिरावतात. ते आपलं घर! जगाच्या कोपर्यात कुठेही गेलात आणि आलिशान अशा हॉटेल मध्ये राहिलात तरी घरासारखा आसरा फक्त आपल्या माणसांमधे मिळतो. एक कुटुंब आणि अशा अनेक कुटुंब संस्था आपल्या समाज रचनेला मजबूत बनवतात. पूर्वी असणार्या एकत्र कुटुंबात तीन पिढ्या गुण्यागोविंदाने…. एकाच घरात रहात असत. त्यामुळे एका पिढीकडून…. दुसर्या पिढीकडे…संस्कार आणि आचार विचारांची…देवाणघेवाण आपोआप होत असे. आता अनेक ठिकाणी दिसणारी विभक्त कुटुंब पद्धती….ही घरातल्या माणसाच्या सोयीने तयार झाली आहेत आणि तसेही… बदल ही काळाची गरज आहे. या बदलत्या जीवनशैली चा परिणाम आपल्या कुटुंब संस्थेवर होताना दिसतो. घटस्फोटाचे आणि एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. Live in relationship, double income…no kid या मतावर ठाम असणारी couples तशी कमी आहे. तरी पण…तो एक नवा trend आहे. त्यामुळेच की काय….आजच्या पिढीला लग्न, मुलं, कुटुंब, नाती यांचे पाश आणि जबाबदारी नको वाटते. कुटुंब लहान असो की मोठे …. आपल्याला हसावं वाटलं…तर हसण्याची….रडावं वाटलं तर रडण्याची…. आणि चिडावं वाटलं…तर चिडायची….एकमेव हक्काची…व्यक्त होण्याची… ती एक जागा म्हणजे… आपलं ‘कुटुंब ‘असते. कुटुंब हा तसा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि जिव्हाळा असला की ते मनाला कुठेतरी भावतं….अशी भावणारी माणसं ही ‘कुटुंबवत्सल ‘ असतात. वात्सल्य हे फक्त स्त्री पुरतं मर्यादीत नसतं. तर कुटुंबा विषयी वत्सलता बाळगणारे पुरुष ही असतात. आजोबा आणि वडिलांनी आपल्या मुला नातवांना दिलेला दम….हा द्यायलाच हवा. घरातलं वातावरण आनंदी राहण्यासाठी…अधनं मधनं असा डोस पाहिजे. आपले घर आणि घरातल्या माणसा विषयी ओढ असणारी….अशी ही कुटुंबवत्सल माणसे असतात. अशी भावबंध जपणारी माणसे सोबतीला असतील तर सुखाचे अनेक सोहळे … उत्साहाने साजरे होतात आणि दुःख ही तितक्याच आवेगाने वाटून घेतले जाते. डोळ्यात गेलेला छोटासा कण काढायला जसा दुसरा कोणीतरी माणूस लागतो. तसेच आयुष्यात आलेले अनेक सुख दुःखाचे क्षण झेलायला माणसे लागतात. स्वतः ची चूक कबूल करण्यासाठी असणारा मनाचा मोठेपणा आणि समोरच्याची चूक उदारपणे माफ करण्यासाठी असणारे मनाचे औदार्य…या दोन्ही गोष्टी तो आणि ती…कुटुंबवत्सल माणसामध्ये आहेत म्हणून आजवर अनेक घराचे घरपण टिकून आहे. तसेही कुणीतरी म्हणून ठेवलंय…घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती 🏠
18th Dec 2025
उन्हाळा
18th Dec 2025
Zen Zen म्हणजे काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. Zen तत्त्वज्ञान ही बुद्ध धर्मातील एक सुंदर विचारसरणी आहे. ही विचारसरणी प्रत्यक्ष अनुभव आणि ध्यान….यावर भर देते. Zen चा अर्थ ध्यान असा होतो. Zen ही एक बौद्ध परंपरा आहे. या परंपरेत आत्मपरीक्षण आणि ध्यान धारणेतून आपल्याला…आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा करता येते. Zen तत्त्वज्ञान तुम्हाला अगदी छोट्या गोष्टीतून….एक नवा दृष्टिकोन सहज देवून जाते. तुम्ही जेव्हा नदीत आपलं पहिलं पाऊल टाकता. त्यानंतर तुमचं दुसरं पाऊल त्याच ठिकाणी ठेवू शकत नाही. नदीचे पाणी हे वाहतं असतं. त्यामुळे नदीच्या पाण्यात आपण….आपलं पहिलं पाऊल टाकतो. तेव्हा ते पाणी आपल्या पायाला बिलगून पुढे निघून जातं. पुन्हा कधीच त्या पाण्यात आपण….आपले पाऊल टाकू शकत नाही. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा असाच आपल्याला स्पर्श करून पुढे निघून जातो. तो पुन्हा मागे आणता येत नाही. आपल्याला पुढे जावं लागतं. साचून राहिलेलं पाणी हे गढूळ होत जातं. मात्र वाहतं पाणी हे स्वच्छ आणि पारदर्शी राहतं. निसर्ग हा आपल्याला सतत…. कसे जगायचे….हे शिकवत असतो. कधी आपण पाऊल असतो तर कधी आपण पाणी असतो. कधी स्थिर असतो. तर कधी अस्थिर….पण तरीही आपण….प्रत्येक क्षणात…नवे असतो. Zen म्हणजे काय? तर काहीही धरून ठेवू नका. सोडून द्या. श्वासांचा आस्वाद घ्या. कृतज्ञतेने श्वास घ्या आणि प्रेमाने श्वास सोडून द्या. आपल्या आयुष्यातील अनेक समस्या ध्यान धारणेतून आपण कमी करू शकतो. खरा आनंद फक्त संपत्ती आणि प्रसिद्धी नाही. तर तो आपल्या आत आहे. बौध्द धर्म आपल्याला हेच सांगतो. तुम्ही इतरांना जितके द्याल. तितके तुम्हाला मिळेल. दैनंदिन जीवनात zen मनाला आतून शांत करते. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य तर सुधारते पण हल्ली कमी वयात होणारे BP, Stress, Hyper tension, Imunity, Sleeping problem अगदी सहज सुधारतात. तेव्हा स्वतः साठी आपला zen प्रवास सुरू करा.
18th Dec 2025
दुसरी बाजू
18th Dec 2025
चला बोलूया
18th Dec 2025
Previous Page
Next Page
Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here:
Cookie Policy
Subscribe
Subscribed
Queen
Sign me up
Already have a WordPress.com account?
Log in now.
Queen
Subscribe
Subscribed
Sign up
Log in
Copy shortlink
Report this content
View post in Reader
Manage subscriptions
Collapse this bar
Design a site like this with WordPress.com
Get started